नागपूर- विवाहास नकार दिला म्हणून प्रियकरानेच  प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एम्प्रेस मॉलच्या चवथ्या माळ्यावरील निर्माणाधीन कामाच्या ठिकाणी प्रेयसीला नेऊन तिची हत्या करून शव तेथेच ठेवून प्रियकर पळून गेला होता. मयत तरुणीचे नाव नाव फरजाना कुरेशी (वय 20, गड्डीगोदाम) असे आहे. मुजाहिद अंसारी (वय 22) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुजाहिद बजाजनगरमध्ये एका गॅरेजमध्ये काम करायचा.फरजाना आणि मुजाहिद यांचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र घरच्याचा विचार करून फरजानानं मुजाहिदला लग्नास नकार दिला..दरम्यान फरजानाचे लग्न ठरल्याचे समजताच मुजाहिदने तिला अखेरचे एकदा भेटायचे म्हणून एम्प्रेस मॉलला बोलवले. त्यानंतर तो तिला मॉलच्या निर्माधिन चवथ्या माळ्यावर घेवून गेला.आणि तिनं लग्नास नकार दिल्याच्या रागातून दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली.दरम्यान 2 डिसेंबरपासून फरजाना बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने सदर पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला असता मुजाहिदसोबतच्या चॅटिंगची माहिती समोर आल्याने आरोपी मुजाहिदला ताब्यात घेण्यात आले. लिसी खाक्या दाखविताच त्याने हत्येची कबुली दिली. एम्प्रेस मॉल चौथ्या माळ्यावर ही घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे.तेथिल सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ही निर्माण झाले आहे.