दापोली :  आजकाल शॉर्ट विकेंड ट्रीपसाठी अनेक पर्यटक कोकणाची निवड करतात. लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत असले तरीही इथे येताना पर्यटकांची हाडं मात्र चांगलीच खिळखिळी होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात अजूनही पर्यटन स्थळापर्यंत जाणार्‍या रस्त्यांची दुर्दशा आहे.दापोलीतल्या मुरूडला तर दरवर्षी 10 लाख पर्यटक भेट देतात इथला समुद्र किनारा हा सगळ्यात सुरक्षित समुद्र किनारा म्हणून प्रसिद्ध आहे. 


मुरूडच्या किना-यावर येण्यासाठी मुख्य रस्त्यापासून सुमारे 5 किलोमीटर आतमध्ये यावं लागतं . या प्रवासाला साधारणपणे एक तासाचा वेळ लागतो त्यामुळे इथे आलेले पर्यटक नाराज होतात.


गेल्या 15 वर्षांपासून इथले स्थानिक हॉटेल व्यावसायिक हा रस्ता व्हावा यासाठी पाठपुरावा करताय मात्र ठिम्म प्रशासन याकडे लक्ष देत नाहीय एका बाजुला पर्यटन पर्व सारखे उपक्रम पर्यटन व्यावसाय वाढीसाठी करतोय मात्र दुस-या बाजुला याच पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते मात्र खड्ड्यात गेलेले पहायला मिळत आहेत त्यामुळे इथले व्यावसायिक चांगलेच अडणीत आले आहे.