निलेश वाघ, मनमाड : जबरदस्ती किंवा हुंडा घेणाऱ्यांचा विवाह न लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने घेतला असून तशा सूचना काझी व इतर मंडळींना देण्यात आल्या आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादच्या आयशा खान आत्महत्या प्रकरणामुळे दहेज परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महिलांचे आयुष्य उद‌्ध्वस्त करणारी ही परंपरा मोडीत काढण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्डाने पुढाकार घेतला आहे. कमी खर्चात साध्या पद्धतीने निकाह करण्यासंबंधी आता जनजागृती करण्यात येणार असून , ११ ते २० मार्च दरम्यान राज्यभर तशी मोहिम राबविली जाणार आहे. राज्यभरातील ३५ जिल्ह्यांच्या ४०० मुस्लीम मुफ्ती, काझी, मौलाना आदी धर्मगुरुंनी ऑनलाईन बैठकीत दहेज विषयावर दीर्घ चर्चा  केली.


मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफूज रहेमानी यांनी दहेज पद्धत समाजाला घातक असल्याचे नमूद केले. इस्लामने अगदी साध्या व सोप्या पध्दतीने निकाह करण्यास मान्यता दिली आहे. मात्र या पद्धतीचा अवलंब न करता समाज विघातक पद्धतींने आपलेसे केले जात आहे. हुंडा विरोधात प्रबोधन करणे काळाची गरज त्यांनी व्यक्त केली.  या निर्णयाचे मुस्लीम महिलांमधून स्वागत करण्यात येत आहे.


मुस्लीम धर्मात दहेज घेणे व देणे असेल असे लग्न न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .ज्या ठिकाणी मुलींवर अन्याय अत्याचार केले जातात असे विवाह न लावण्याच्या सूचना आता सर्व धर्मगुरूने देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे यासाठी आता जनजागृती केली जाणार आहे त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफूज यांनी म्हटलं आहे.


मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून चालविण्यात येणारी ही मोहीम कौतुकास पात्र आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. अनिष्ट रूढी परंपरा थांबातील एकदा या मोहिमेला सुरुवात झाली ही आपोआपच जनजागृती होईल. असं सईदा रहेमानी यांनी म्हटलं आहे.