मुंबई : राज्यातील नागपूर, अमरावती आणि अनेक राज्यांमध्ये शनिवारी रात्री आकाशात रहस्यमय प्रकाश दिसून आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशात आगीचे भलेमोठे आगीचे गोळे वेगाने जाताना दिसत होते. नक्की हे काय प्रकरण आहे. याबाबत काही लोकांमध्ये उत्सुकता तर काही लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि इतर जिल्ह्यात शनिवारी रात्री आकाशात आगीचे गोळे दिसून आले. त्या उल्कातर नाही ना... याविषयी अनेकजण चर्चा करीत होते. तर काहींच्या मते जळालेल्या विमानाचे पार्ट्स असतावेत. तर काहींच्या मते ते तुटता तारा असावेत.


प्रथमदर्शनी समोर आलेल्या व्हिडीओमधून हे उल्कापिंड असल्याचे बोलले जात आहे. नागपूरच्या खगोलतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, कोणत्यातरी उपग्रहाचा अपघात झाला असावा. त्यामुळे हे उल्कापात पडले असावेत. परंतू या घटनेबाबत लोकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं आहे.