पूजा चव्हाण प्रकरणात गूढ कायम, यवतमाळहून पुण्याला कशी पोहोचली पूजा?
पूजाच्या मृत्यूचे गुपित काय ?
पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.. मात्र यवतमाळ आणि पुण्यातील काही घटनांचे धागे अजूनही जुळत नाहीत. त्यामुळं या प्रकरणातलं गूढ आणखी वाढतच चाललं आहे.
- विमान प्रवासात पूजाच्या मृत्यूचे गुपित ?
- ५७४ किलोमीटरचा प्रवास इतक्या वेगानं कसा ?
- यवतमाळच्या डॉक्टरांची भूमिका संशयास्पद
- यवतमाळ पॅटर्न म्हणजे घटनेला कलाटणी देण्यासाठी रचलेला डाव ?
असे विविध प्रश्न निर्माण उपस्थित होण्याचं कारण म्हणजे यवतमाळ मधील गर्भपात आणि पुण्यातील आत्महत्या. ६ फेब्रुवारीला यवतमाळ मध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात आणि मिळालेला दुपारी दोन वाजताचा डिस्चार्ज.... आणि तोच दिवस रात्री १२ ला संपल्यानंतर दीड तासांनंतर रात्री दीड वाजता पुण्यातील हेव्हन पार्क येथील सोसायटीच्या खाली पूजा चव्हाणचा मृत्यू. या दोन घटनांमधील अंतर म्हणजे अवघ्या काही तासांचे असल्यानं कितीही वेगानं यवतमाळ ते पुणे प्रवास केला तर कमीतकमी १५ तास लागतात. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम अशक्यप्राय वाटतो. ५७४ किलोमीटरचे अंतर इतक्या जलद गतीने केले असेल तर त्याचा एकमेव पर्याय म्हणजे हवाई प्रवास...नागपूर ते पुणे हा हवाई प्रवास दीड तासांचा आहे. दुपार ३ नंतर ते रात्री ११.३० वाजेच्या पूजाला आणलं असावं असा कयास लावला जातो आहे.
यवतमाळमध्ये उपचारादरम्यान पूजाचा पत्ता हा परळी किंवा पुणे नसून शिवाजीनगर नांदेड येथील आहे. आणखी एक बाब म्हणजे गर्भपात झाला त्यावेळी अरुण राठोड ही व्यक्ती सोबत हाती. तर दुसरी बाब म्हणजे पुण्यात मृत्यू झाला त्या दरम्यान ही अरुण राठोडच व्यक्ती सोबत होता. त्यामुळे पूजा नावाचा दोन ठिकाणी उल्लेख असला तरी अरुण राठोड मात्र एकच नाव आहे. इतका मोठा प्रवास रस्त्याने १० ते ११ तासांत शक्यच नसल्यानं हवाई प्रवास झाला हे म्हणायला शंका आहे. नसेल केला तर इतक्या वेगानं हा प्रवास का केला हा देखील प्रश्न आहे.