बारामती : विद्याप्रतिष्ठान संचलित कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयास "अ" श्रेणी मूल्यांकन प्राप्त झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापीठ मान्यता आयोगाने १९९४ साली, उच्च शैक्षणिक  संस्थेतील  गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता आयोग (नॅक), ह्या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. या कार्यक्रमांतर्गत नॅकच्या मूल्यांकनासाठी समितीने बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट दिली होती. भेटी दरम्यान समितीने महाविद्यलयातील उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक वातावरण व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अंतर्भूत करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे मूल्यमापन केले. महाविद्यलयास विविध निकषांवर आधारित ३.१२ सरासरी गुण देऊन सदर समितीने "अ" श्रेणीचे  मूल्यांकन दिले आहे.


कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य व रोजगारक्षमता वाढविण्यासाठी महाविद्यलयाने विविध व्यावसायिक प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित केले होते.  विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता व उद्योजगता निर्माण होण्यासाठी विविध औदयोगिक संस्था व आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबरच्या सामंजस करारामार्फत  "अनुभवावर आधारित शिक्षण" पद्धतीचे अवलंब महाविद्यालयामध्ये करण्यात येतो. मे  - जून २०१७ मध्ये सोळा विद्यार्थ्यांना  विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.  सदर मूल्यांकण समितीने महाविद्यालया मार्फत  दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा , विद्यार्थीकेंद्रित विकास आणि शैक्षणिक कामगिरीवर यावर विशेष भर देत मुल्यांकन केले.