कचऱ्याच्या ट्रॅक्टरमधील अर्धनग्न मनोरूग्णाचा व्हिडिओ व्हायरल
स्वच्छतेच्या नादात राहाता नगरपालिकेला माणुसकीचा विसर पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.
शिर्डी : स्वच्छतेच्या नादात राहाता नगरपालिकेला माणुसकीचा विसर पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.
कच-याच्या ट्रॅक्टरमध्ये एका मनोरुग्णाला नेल्याचं या व्हिडिओत दिसतंय. एका जिवंत माणसाला कच-याच्या गाडीत अर्धनग्न अवस्थेत टाकून गावातून नेताना कर्मचारी दिसताहेत. माणूस आहे हे ही कर्मचारी विसरलेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
रूग्णाला केलं दवाखान्यात दाखल
त्या व्यक्तीला मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी गावापासून 8 किलोमीटर लांब असलेल्या कचरा डेपोवर सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कचऱ्यासोबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चक्क एका मनोरूग्णाला गाडीतून गावाबाहेर नेले आहे.