अहमदनगर : अहमदनगरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयाची आमदार अरूण जगताप यांना अटक करण्यापूर्वी तोडफोड करण्यात आली होती. आमदार अरूण जगताप हे अहमदनगरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात चौकशीसाठी होते, नगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी अरूण जगताप यांची चौकशी सुरू होती, त्यावेळी २२ जणांनी येऊन कार्यालयाची तोडफोड केली आणि त्यांना सोबत घेऊन गेले.


पोलीस अधिक्षक कार्यालयाचीच तोडफोड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार अरूण जगताप यांना पोलिसांकडून सोडवण्यासाठी जमावाने कार्यालयाची प्रचंड तोडफोड केली, यामुळे अहमदनगर पोलीस अधिक्षक कार्यालयात काचेचा खच पडला होता. मात्र यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आमदार अरूण जगताप, आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज अहमदनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच अहमदनगर बंदची देखील हाक देण्यात आली आहे.


अहमदनगरचं दुहेरी हत्याकांड


अहमदनगरमध्ये पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात संजय कोतकर, वसंत ठुबे यांचा दोन जणांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता अटकसत्र सुरू केलं आहे.