Nagpur News Today: नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 17 वर्षांच्या मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर वार करत आत्महत्या केली आहे. धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यामुळं अल्पवयीन मुलीच्या पालकांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी आई-वडील उठल्यानंतर मुलीच्या खोलीत गेले तेव्हा ती तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ऑनलाइन गेमिंग टास्कमुळं तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचं काम अद्याप अस्पष्ट असून तिने आत्महत्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे समोर आले आहे. 


तरुणीच्या पालकांनुसार, मुलगी अभ्यासात हुशार होती. ती विविध विषयांवर छान लिखाण करत होती. ती ऑनलाइन गेम खेळत असल्याचेही समोर आलं आहे. याच गेम टास्कमुळं तिने हे पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या आत्महत्या करण्यामागे नेमकं काय घडलं हे अजून स्पष्ट झालं नाही. आत्महत्या पूर्वी तिने चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्याच्यातून आणखी काही उलगडे होण्याची शक्यता आहे. पुढील तपास धंतोली पोलीस करत आहे. 


दरम्यान, ऑनलाइन गेममुळं आत्महत्या करण्याचे हे काही एकमेव प्रकरण नाहीये. यापूर्वीही महाराष्ट्रात अशी प्रकरणे समोर आली होती. यापूर्वीही एका तरुणाने गेमच्या वेडापायी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना सातत्याने घडत असल्याचे पाहून पालकांनी मुलांच्या मोबाईलच्या व्यसनाचा आणि आपलं मुलं फोनवर काय पाहत असतं याबाबत सजग असणं गरजेचं आहे.. 


विवाहितेची आत्महत्या


 हुंडाबळीचे प्रकार अजूनही समाजात वाढतच असून नाहक महिलांचे बळी जात आहेत. हुंडाबळीची अशीच एक घटना नांदेड शहारात घडलीये. नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील तुळशीराम नगर मधील प्रियंका ही विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. 2020 साली अभिजित अन्नपूरे सोबत झाला होता. विवाहाच्या काही दिवसांनंतर पासूनच पती आणि सासरच्या लोकांनी प्रियंका ला मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरु केले होते. 2022 मध्ये प्रियंकाला मुलगा झाला. या नंतर तरी सगळे काही ठीक होईल असे वाटले होते पण प्रियंकाला त्रास देणे सुरूच होते. माहेराहून सोने आण म्हणून प्रियांकाचा छळ केला जात होता. अखेर 25 जानेवारी रोजी रात्री प्रियंकाने गळफास घेतल्याचे सासरच्या लोकांकडून सांगण्यात आले. 


शासकीय रुग्णालयात जाऊन पाहिले असता प्रियंका मृत अवस्थेत आढळली. या प्रकरणी प्रियंकाच्या आईच्या तक्रारीवरून प्रियंकाचा पती, सासू सासरे आणि नणंद अश्या चौघाविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात हुंडाबळी आणि मृत्यूसाठी कारणीभूत असल्याच्या कलमान्वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.