अमर काणे, झी 24 तास, नागपूर : नागपुरातील शाळा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. एका खासगी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून काहीसं भीतीचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार एकाच शाळेतील 38 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आता शाळा बंद ठेवण्यात आली असून, उर्वरित विद्यार्थ्यांचे रिपोर्ट केले जाणार आहेत.


एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोरोनाबाधित आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच आता शाळा सुरू झाल्याने पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


रविवारी 24 तासात 262 कोरोना बाधित नागपुरात आढळले. नागपुरात पुन्हा एकदा करुणाने दिवसाला 250 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जयताळा येथील एका खाजगी शाळेमधील हे 38 विद्यार्थी आहे. यामध्ये 19 विद्यार्थी शहर भागातील तर 19 विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे.


नागपुरात 3 जुलैपासून कोरोना वाढतोय, पाहा तारखेनुसार आकडेवारी 
2 जुलै - 95
3 जुलै - 105
5 जुलै - 135
8 जुलै - 138
12 जुलै - 146
13 जुलै - 194
16 जुलै -176
17 जुलै - 262