नागपूरमध्येही ५०० किलो खिचडीचा बेत
राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही आंतरराष्ट्रीय आहार दिनानिमित्त पाचशे किलो खिचडीचा बेत आखण्यात आला आहे. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हा खिचडीचा महाबेत आखला आहे.
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही आंतरराष्ट्रीय आहार दिनानिमित्त पाचशे किलो खिचडीचा बेत आखण्यात आला आहे. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हा खिचडीचा महाबेत आखला आहे.
तब्बल पाचशे किलो खिचडी ते बनवणार असून, मैत्री परिवार आणि CAC ऑल राऊंडर आणि शेफ विष्णू मनोहर या खिचडीचं वाटपही करणार आहेत. दोन टप्यांमध्ये खिचडी तयार करणार असून, या निमित्ताने खिचडीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार. यात, पौष्टीक खाद्य पदार्थ,डाळी आणि भाज्यांचाही समावेश असेल.
दिल्लीतही खिचडीचा बेत
खिचडी हा खास भारतीय पदार्थ सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवामध्ये तब्बल 800 किलो खिचडी शिजवली जाणार आहे. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली एका अवाढव्य कढईमध्ये ही खिचडी तयार होईल.
अत्यंत स्वस्त आणि तरीही मस्त आणि आरोग्यवर्धक असलेल्या खिचडीचा स्वाद महोत्सवासाठी आलेल्या देशविदेशी पर्यटकांना चाखता येणार आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेली कढई इथं आलेल्यांचं लक्ष वेधून घेतेय.
संजीव कपूर ही खिचडी करताना काही वेगळे प्रयोगही करणार असल्याचं समजतं.