नागपूर : नागपूर म्हाळगीनगर चौकात टिप्परनं पीक अप व्हॅनला धडक दिलीय. या अपघातात 2 जण ठार 10 जण जखमी झालेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती प्रकृती गंभीर आहे. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत चित्रित झालाय. बोलेरो पीक अप मानवेडा चौकाकडून दिघोरी चौकाकडे वेगानं जात होती. त्याचवेळी टिप्पर माटे वाईन शॉपकडून हुडकेश्वकडे म्हाळगी नगर चौक क्रॉसकरून जात होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक टिप्पर आडवा आल्यानं वेगानं जाणा-या पीक अप व्हॅनला धडक लागली आणि गाडी चौकात पलटली. पीकअपच्या मागे बसलेले काही जण गाडीबाहेर फेकल्या गेले. 



या अपघातात पीक अपमध्ये बसलेले राहुल बंजारा आणि भैरुलाल गौड यांचा मृत्यू झाला. दोघेही मृत मध्य प्रदेशातील मदसौर इथले आहेत. तर या अपघातात अजून 9 जण जखमी झाले असून त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे.सक्करदरा पोलिसांनी टिप्पर चालकाला अटक केली आहे.