Nagpur Accident : नागपुरातून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. नागपुरच्या बिडगाव परिसरात भरधाव टिप्परने बहीण भावाला धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला होता. बहिण भावाच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपूरमधील बिडगाव परिसरात कचरा घेऊन टिप्परने बहिण भावाला चिरडल्याची घटना घडली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडली आहे. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सुमित सैनी (18) अंजली (16) अशी अपघातात मृत पावलेल्या भाऊ बहिणीचे नाव आहे. अंजली ही एका कॅफेत काम करत होती तर भाऊ सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता. भीषण अपघातात बहिण- भाऊ दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


दुसरीकडे, या भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने थेट ट्रकला आगीच्या भक्ष्यस्थानी पाडलं. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाने ट्रकला लागलेली आग विझवली.


दरम्यान, गुरुवारी देखील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मिनीबसने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. श्रेया जीवन रोकडे (१८, रा. गणेशनगर, कोतवाली) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक चौक परिसरात गुरुवारी सकाळी नऊ वाजता घडली होती.


श्रेया आणि तिची मोठी बहीण साक्षी या स्कूटीने जात होत्या. त्यावेळी चौकात सिग्नल लागला होता. त्यामुळे त्या स्कूटी घेऊन सिग्नलवर उभ्या होत्या. त्याचवेळी एमएच 40 वाय 6879 क्रमांच्या मिनीबसच्या त्यांना मागून धडक दिली. यात श्रेया आणि साक्षी दोघी खाली पडल्या. यात श्रेयाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी श्रेयाला तपासून मृत घोषित केले.