Nagpur Accident News : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह अपघातानंतर देशभरात चर्चेला उधाण आलं होतं. अशातच आता राज्याच्या उपराजधानीत देखील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ  कारचालक तरुणान तीन लोकांना उडवल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. कारचालक आणि गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्याचं देखील समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्राईव्हर तरुण आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यदर्शींनी दिलीये. या घटनेत पायी जाणारी महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर जमावाने मद्यधुंद तरुणांना चोप दिला अन् ड्राईव्हर तरुणाला बेदम चोप दिलाय. त्यानंतर जमावाने तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. या गाडीत गाडीमध्ये अमली पदार्थ ही सापडले आहेत. सनी चव्हाण, अंशुल ढाले आणि आकाश अशी आरोपींची नावे आहेत. विविध भागातून अपघाताच्या घटना समोर येत असल्याने राज्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न विचारला जातोय. 


पाहा Video



 


पुणे अपघात प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय. आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आपला ड्रायव्हर गंगाधर पुजारीला ही ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पोलीस तपासातही हे निष्पन्न झालंय. कारण विशाल अग्रवालवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विशाल अग्रवाल यांनीच मुलाला गाडी चालवायला दे असं सांगितल्याचा जबाब ड्रायव्हर गंगाधर पुजारीने याआधी दिला होता. मात्र आता हाच जबाब बदलण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव टाकला जातोय. तेव्हा पुणे पोलीस आता ड्रायव्हर गंगाराम पुजारीचे कॉल रेकॉर्डही तपासणार आहेत.