Nagpur Accident : नागपुरातून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॅनने चिरडल्याने एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपुरच्या (Nagpur Crime) भरतनगरमध्ये घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या तरुणीने नुकतीच सनदी लेखापालची (CA) ही अवघड अशी परीक्षा उत्तीर्ण करत घवघवीत यश मिळवलं होतं. मात्र तरुणीने आई वडिलांसह कुटुबियांची स्वप्ने पूर्ण करण्याआधीच जगाचा निरोप घेतला आहे. इतकी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तरुणीचे पालक आनंदीत होते. भविष्यात तिला आणखी यश मिळावं यासाठी ते पूजा करण्यासाठी देखील गेले होते. मात्र एका घटनेमुळे त्यांचे सारं जगच बदललं आहे. तरुणीच्या मृत्यूचा थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झालेली 24 वर्षीय वैष्णवी गणेश धर्मे हिला एका कंपनीत ऑनलाईन मुलाखात द्यायची होती. त्यामुळे ती स्कूटीवरुन घराकडे निघाली होती. मात्र घरी परततानाच काळाने तिच्यावर घाला घातला. घरी जाताना एका भरधाव व्हॅनने वैष्णवीला धडक दिली आणि तिला चिरडत नेलं. अपघातानंतर वैष्णवी व्हॅनच्या चाकाखाली अडकून पडली होती. शेवटी स्थानिकांनी पुढे येत तिला बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.


हा अपघात इतका भीषण होता की वैष्णवी अक्षरशः व्हॅनच्या धडकेनंतर 50 फूट लांब उडून पडली. वैष्णवीने दोन आठवड्यांपूर्वी सीएची परीक्षा पास केली होती. ती सीताबर्डी येथील एका कंपनीत कामाला होती. तीन बहिणींमध्ये सर्वात लहान असलेल्या वैष्णवीचे आई-वडील देवदर्शनासाठी उत्तर प्रदेशात गेले होते. मात्र तिच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.


वैष्णवी ही त्यांच्यासोबत राहणाऱ्या वहिणीला सोडण्यासाठी सकाळी सूर्यानगर येथे स्कूटीने जात होती. वैष्णवीची मंगळवारी दुपारी ऑनलाइन मुलाखत होती. वहिणीला सकाळी तिच्या घरी सोडल्यानंतर घरी परतत असताना भारतनगर चौकात एम.एच.-31 ए.जी. 5117 क्रमांकाच्या भरधाव व्हॅनने वैष्णवीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर व्हॅनचालकाने तिला चिरडत नेले. स्थानिकांनी वैष्णवीला गाडीच्या खालून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र वैष्णवीचा मृत्यू झाला होता.



दरम्यान, व्हॅनचा वेग इतका जास्त होता की गाडीने वैष्णवीला 50 फुटांपर्यंत फरफटत नेले. वैष्णवीनने हेल्मेट घातले असले तरी तिच्या डोक्याला, यकृताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती वैष्णवीच्या कुटुंबियांना कळवल्यानंतर ते विमानाने नागपूरला पोहोचले होते. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री वैष्णवीचा मृत्यू झाला.