अमर काणे, झी मीडिया, नागपूर : Sanket Bawankule Nagpur News: नागपूर हिट अँड रन प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना अनेक सवाल उपस्थित केलेत. संकेत बावनकुळेंवर (Sanket Bawankule) अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये.. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हाच दाखल केलेला नाही मग निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय.. नागपूर अपघात जखमी झालेले लोकं पुढे आलेली नाहीये. तसेच तक्रारदार यांच्यावर दबाव आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर हिट अँड रन प्रकरणी सुषमा अंधारेंनी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना अनेक सवाल विचारलेत. संकेत बावनकुळेंवर गुन्हा का दाखल केला नाही? अपघात झालेली गाडी थेट दुरुस्तीसाठी का पाठवली? तसंच संकेत बावनकुळेंचं मेडिकल का केलं नाही? असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केलेत.


एकीकडे सुषमा अंधारे यांनी हे सवाल करत पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. तर दुसरीकडे खासदार संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. कायदा सर्वांसाठी समान हवा, सलमान खान, संकेत बावनकुळे सुटतात कसे असा सवाल राऊतांनी उपस्थीत केलाय. अपघातग्रस्त गाडीत लाहोरी बारचं बिल सापडलं ते समोर आणा असं आव्हानही राऊतांनी पोलिसांना केलंय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले असा आरोपच संजय राऊत यांनी केलाय.


बिलामध्ये असं काही नमुद नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलीय. आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही आणि आम्ही त्याला बळी पडण्याचा कुठलाही कारण नाही, जी काही कायदेशीर प्रोसिजर आहे, आम्ही त्या पद्धतीने समोर जात आहोत. ऑडी कार अर्जुन चालवत होता, त्याच्या शेजारी संकेत बसला होता, तर पाठीमागच्या सीटवर रोनित बसला होता. जो काही तपास सुरू आहे तो नियमाप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे कोणालाही वाचवण्याचा कारण नाही. असं उपायुक्त राहुल मदने यांनी म्हटलं आहे.


दुसरीकडे नागपूर अपघात प्रकरणावरून सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यामध्येही जुंपल्याचं पाहायला मिळतंय. संकेत बावनकुळे गाडी चालवतांना दिसला असता तर आम्ही त्याला सोडलं नसतं असं विधान काँग्रेस नेते विकास ठाकरेंनी केलं.. आमचं या घटनेकडे लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय.. तर दुसरीकडे विकास ठाकरेंच्या या विधानावर सुषमा अंधारेंनी मात्र आक्षेप घेतल्याचं दिसतंय.. ते असे का बोलले हे अनाकलनीय आहे काँग्रेसचे काही स्थानिक नेते भाजपला मदत तर करत नाही ना असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.. तर अंधारेंच्या या आरोपीला विकास ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलंय. मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असा टोला विकास ठाकरेंनी लगावलाय.. नागपूर कार अपघात प्रकरणानंतर बावनकुळेंवरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.


सुषमा अंधारे यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये जात प्रश्नांची सरबत्ती केल्यानं वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळतंय.