Nagpur Crime: नागपुरातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 8 वर्षीय मुलीवर घरात शिरून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे नागपुरात संताप व्यक्त केला जातोय. पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अत्याचार करुन अनोळखी आरोपीने तिथून धूम ठोकली आहे. दरम्यान पोलिसांकडून त्याचे स्केच तयार करण्यात आले असून तपास सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरातील पारडी परीसरात एका 8 वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.8 वर्षीय बालिका आपल्या 4 वर्षीय बहिणी सोबत घरी होती. दोघींचे आई वडील कामावर कामाला गेले होते. आरोपीने ही संधी हेरली आणि घरात प्रवेश केला. रविवारी दुपारच्या सुमारास तो दुचाकीवरून आला. गाडी घराबाहेर लावली आणि घरात शिरला. त्याचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष इतके होते. 


घरी वडील आहेत का?


घरी वडील आहेत का? अशी विचारणा त्याने मुलींना केली. नाही कळाल्यावर त्याच्याचील सैतानाने संधी हेरली. त्यानंतर पाच वर्षीय मुलीला त्याने घराबाहेर ठेवले. त्यानंतर 8 वर्षीय मुलीला आतल्या खोलीत नेत तिच्यावर त्याने अत्याचार केला आणि तो फरार झाला.


आई-वडिलांकडून पोलिसांत तक्रार


आई वडील रात्री घरी आले. हा प्रकार समजल्यावर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तात्काळ पारडी पोलिसात तक्रार दिली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपीचे स्केच तयार करुन तपास सुरु


सध्या त्या आरोपीची ओळख पटत नाहीय. पोलिस यंत्रणेद्वारे आरोपीचे एक स्केच तयार करण्यात आले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.