`त्या` एका मागणीमुळे तो चिडला; 24 वर्षीय तरुणीच्या 57 वर्षाच्या प्रियकराने तिच्यासह असं कृत्य केले की पोलिसही हादरले
नागपूरमध्ये 24 वर्षीय तरुणीसह तिच्या 57 वर्षाच्या प्रियकराने धक्कादायक कृत्य केले आहे. तिचा फोन बंद असल्याने हे सर्व प्रकरण उघडकीस आले.
Nagpur Crime: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 24 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणीच्या 57 वर्षाच्या प्रियकरानेचे तिची हत्या केला. पोलिस तपासात हत्या करण्यामागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. यामुळे पोलिसही अंचबित झाले आहेत.
24 वर्षीय तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आलीय . मानकापूर पोलिसांनी 57 वर्षीय महेश वळसकर या आरोपी प्रियकराला अटक केलीय. प्रिया बागडी असे 24 वर्षीय खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
प्रिया गेल्या 16 ऑगस्टपासून बेपत्ता होती. तिचा मोबाईल बंद येत असल्यामुळे तिच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अखेरचे मोबाईल लोकेशन घेऊन तपास सुरु केला. तिचे शेवटचे लोकेशन रामटेकमधील एका हॉटेलमध्ये मिळून आले.
हे हॉटेल आरोपी महेश वळसकर यांच्या मालकीचे होते. पोलिस तपासात महेशसोबत सहा वर्षांपासून तिचे प्रेमसंबंध होते असे माहिती उघडकीस आली. प्रिया लग्नासाठी महेशमागे तगादा लावत होती. मात्र, महेश लग्न करण्यास तयार नव्हता. यातूनच महेशने तिची हत्या केली. यानंतर तिला हॉटेलपासून तीन किमी अंतरावर जंगलात पुरले.
पोलिसांनी आरोपी महेश वळसकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रियाचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहे.
नागपूरमध्ये अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या वादातून सुनेनंच सासूचा काटा काढला
नागपूरमध्ये अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या वादातून सुनेनंच सासूचा काटा काढल्याची घटना घडलीये...वैशाली राऊतनं तिच्या चुलत भावांच्या मदतीनं सासू सुनिता राऊतची गळा दाबून हत्या केली...28 ऑगस्टला ही घटना घडलीये...सुरूवातीला वैशाली राऊतनं सासूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा बनाव केला...मात्र, तिच्या पाच वर्षांच्या मुलीनं नातेवाईकांना मामांनी आणि आईने आजीला गळा दाबून मारल्याचं सांगितलं...त्यानंतर सुनिता राऊत यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली...त्याचबरोबर शेजा-यांनीही घटनेच्या रात्री सासू-सुनेचं भाडण झाल्याचं पोलिसांना सांगितलं...पोलिसी खाक्या दाखवताच वैशाली राऊतनं गुन्हा कबूल केला असून तिच्यासह तिचे दोन्ही भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांना नागपूर पोलिसांनी अटक केलीये...