पराग ढोबळे, झी मीडिया, नागपुर : नागपूरमध्ये (Nagpur) एक मन सून्न करणारी बातमी समोर आली आहे. एका निर्दयी बापाने पोटच्या मुलीची हत्या केली (Father Killed Her Own Daughter) तर मुलगा मृत्यूशी झुंज देतोय. यानंतर स्वत: बापाने गळफास घेत आत्महत्या केली. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना नागपूरमधल्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वैष्णवी नगरमध्ये घडली. मनोज बेल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. यात सात वर्षांच्या तनिष्काचा मृत्यू झाला तर 12 वर्षीय प्रिन्सवर उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
मृत मनोज बेल आणि त्याची पत्नी प्रिया यांच्यात गेल्या वर्षभरापासून कौटुंबिक वाद सुरु होता (Family Dispute Between Husband and Wife). त्यामुळे ते दोघं विभक्त राहत होते. पत्नी नांदायला येत नाही याचा राग मनोजच्या डोक्यात होता. दोन्ही मुलं प्रियाबरोबरच राहत होती. दर रविवारी दोन्ही मुलं वडिल मनोजला भेटण्यासाठी जात होती. या रविवारी देखील आजोबांनी तनिष्का आणि प्रिन्सला वडिलांकडे सोडलं. पण संध्याकाळी पाच वाजपर्यंतही मुलं न घरी न परतल्याने आजोबांनी मनोजच्या घरी पोहोचले. पण घरातल्या दृश्य पाहून त्यांत्या पायाखालची जमीनच सरकली.


तनिष्का आणि प्रिन्स ही दोनही मुलं जमिनीवर निपचित पडली होती. तर मनोज घरात गळफास घेतलेल्या आपस्थेत होता. आजोबांनी याची माहिती तात्काळ पोलिसांनी दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तनिष्का आणि मनोजचा मृत्यू झाला होता, तर प्रिन्सची प्रकृती गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देतोय. 


मनोज आणि मुलगी तनिष्काच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणर आहे. पण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


वर्ध्यात त्या महिलेच्या हत्येंच गुढ उकललं
दरम्यान, वर्धा जिल्ह्याच्या सत्याग्रही घाटात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. ज्योत्सना भोसले असं मृत महिलेचं नाव असून ती अमरावती जिह्यात राहणारी आहे. पतीनेच या महिलेची हत्या केल्याचे उघड झालं आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने जोत्सनाची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर मृतदेह जाळण्याच प्रयत्न केला आणि अर्धवट जळावेला मृतदेह सत्याग्रही घाटात फेकून दिला.


मृत महिलेचा पती हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत, दारुबंदी आदी विविध गंभीर असे दहा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  वर्धा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथकं, तळेगाव पोलिसांची 2 आणि आर्वी पोलिसांचे 1 अशा सहा पथकांनी या हत्येचा उलगडा केला.