Nagpur Crime News :  वाढदिवस म्हटंल की गिफ्ट आलेच. बरेचजण महागड्या वस्तु बर्थ डे गिफ्ट म्हणून देतात. मात्र, नागपुरमध्ये एका मामाने आपल्या भाच्याला असे खरतनाक बर्थ डे गिफ्ट दिले की थेट पोलिसच घरी पोहचले. पोलिसांनी हे गिफ्ट ताब्यात घेत या मामा भाच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


मामाने असं काय बर्थ डे गिफ्ट दिले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात एका मामाने आपल्या भाच्याला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून चक्क देशी कट्टा दिला आहे. हे गिफ्ट मामा भाच्याला चांगलंच महागात पडल आहे. क्राईम ब्रँचने अल्पवयीन भाच्याकडून कट्टा जप्त केला आहे.  आरोपी मामाचं नाव ब्रिजेशकुमार रत्ने असं आहे. तो छिंदवाड्याचा रहिवासी आहे. त्याने 17 वर्षीय भाच्याला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून देशी कट्टा दिला. पोलीस ब्रिजेशकुमारचा शोध घेत आहेत. 


पोलिसांना कसं समजले?


मामाने वाढदिवसाला  दिलेलं अनोखे गिफ्ट अर्थाता हा देशी कट्टा घेऊन भाचा शहरभर फिरत होता. याची माहिती क्राईमब्रांचच्या युनिट तीनला मिळाली. त्यानंतर प्रजापती नगर येथून अल्पवयीन भाच्याकडून बंदूक, मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली.  मामा ब्रिजेशकुमारचा पोलिस शोध घेत आहेत.  पुढील तपास लकडगंज पोलीस करत आहेत.


भरदिवसा ज्वेलर्सला गंडा घातला


विरार पूर्वेच्या वैभव ज्वेलर्स दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या या आरोपिंनि ज्वेलर्स मालकाला बोलण्यात गुंतवून त्याच्या कडील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. हा सर्व प्रकार सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी ज्वेलर्स मालकाने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सिसिटीव्ही फूटेजचा तपास घेत आरोपिंना अंबरनाथ परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून साडे सहा लाखांचे चोरलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.


हॉटेल मॅनेजरला आणि वेटरला मारहाण करत लुटले


कल्याण पूर्वेत एका हॉटेल मॅनेजरला आणि वेटरला मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. याच प्रकरणात कल्याण क्राईम ब्रँचने तपास करत तीन आरोपीना आंबिवली परिसरातून ताब्यात घेतले आहे. प्रेमकुमार गोस्वामी,सुरज विश्वकर्मा,नाबीर शेख असे या तिघांनी नावे आहेत. या तिघांकडून तीन मोटरसायकल ,पाच मोबाईल फोन असा सुमारे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील एक आरोपी नाबीर शेख हा कल्याणच्या एका बार मध्ये कामाला होता. त्याचे बार मॅनेजरसोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर त्याने बार मधील  काम सोडले. यानंतर बारमधील वेटर आणि मॅनेजरला धडा शिकवण्यासाठी आपल्या दोन मित्रासोबत एक गॅंग बनवली. बार मॅनेजर आणि वेटरला एकट्यात गाठून त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्याकडील मोटरसायकल पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन आरोपी फरार झाले होते.