अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  नागपुरात खासदार डॉ विकास महात्मे  यांच्या संकल्पनेतून नागपुरातील डॉ. परीक्षित महाजन आणि डॉ. अनंतसिंग सिंग राजपूत या दोन डॉक्टरांनी पोर्टेबल कोरोना चाचणी कक्ष तयार केला आहे. 'STOP कोरोना' (Gadget for Safety To Operating Persons) नावाचे  हे एक उपकरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे निदान करण्यासाठी संशयास्पद रुग्णांची तपासणी करण्यासाठी घशातील स्रावांचे नमुने घेऊन पाठवावे लागतात. हे करताना रुग्ण कोरोना बाधित आहे अथवा नाही हे ठाऊक नसते. त्यामुळे ही चाचणी घेणारे डॉक्टर आणि सहाय्यक यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते.


त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं 'STOP कोरोना' (Gadget for Safety To Operating Persons) हे एक उपकरण अर्थात पोर्टेबल कोरोना चाचणी कक्ष तयार करण्यात आला आहे.  



ज्यामध्ये डॉक्टर आणि सहकारी एका बंद केबिनमध्ये उभे राहून, संशयित रुग्णाच्या संपर्कात न येता आजारी व्यक्तीच्या घशातील नमुने घेऊ शकतात. यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांना संपूर्ण संरक्षण मिळेल.


न घाबरता आरोग्य कर्मचारी काम करू शकतील. मुख्य म्हणजे हे करताना त्यांना PPE किट घालण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे या किट वर होणारा खर्च ही कमी करता येईल. 


खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आज हे उपकरण लोकार्पण करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला वापरण्यासाठी दिले.