नागपुरात टोळ्यांसमोर पोलीस निष्प्रभ, गुंडांचा तलवार घेऊन हल्ला
गुंडांचा धिंगाणा सुरु आहे. बारवर तलवारी घेऊन हल्ला करण्यात आलाय. खंडणी न दिल्याने गुंडांनी बार फोडला.
नागपूर : गुंडांचा धिंगाणा सुरु आहे. बारवर तलवारी घेऊन हल्ला करण्यात आलाय. खंडणी न दिल्याने गुंडांनी बार फोडला. गुंड टोळ्यांसमोर पोलीस निष्प्रभ झाल्याचं चित्र सध्या नागपुरात दिसून येत आहे. नागपुरातली गुंडगिरी आटोक्यात आणण्यात पोलीस अपयशी ठरलेत. नागपुरात आशीर्वाद चौकातल्या प्रेमकमल बारवर गुंडांनी रविवारी रात्री तलवारी आणि धारदार शस्त्रांसह हल्ला केला. हा धिंगाणा सीसीटीव्हीत चित्रीत झालाय. खंडणी न मिळाल्याने गुंडांनी हा हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीय. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
शेख रमजान, दद्दू बाळबुधे, ताराचंद व प्रज्वल पिंपरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. रविवारी रात्री पाचही आरोपी तलवार व धारदार शस्त्रांसह प्रेमकमल बारमध्ये घुसले. त्यांनी तिथे तलवारी फिरवत तोडफोड केली. त्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. तोडफोड केल्यानंतर हल्लोखोर तिथून पसार झाले.