भंडारा : Crime News : Gangster Abu Khan : अखेर फरार कुख्यात गॅंगस्टर आबू खान याला भंडाऱ्यातून अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे आहे. (Gangster Abu Khan arrested from Bhandara) नागपूर झोन चारचे उपायुक्त नुरुल हसन नेतृत्वातील चमूने आबूला भंडाऱ्यातून ताब्यात घेतले. विशेष आबू खान विरोधात 40 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act) लावल्यापासून तो अनेक दिवसांपासून फरार होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिवे मारण्याची धमकी देणे, मालमत्ता हस्तगत करणे यामुळे आबूची दहशत निर्माण झाली होती. नागपूर जिल्ह्याच्या ताजबाग जवळील अमजद हुसेन या व्यक्तीच्या तर सहा दुकानांवर त्याने यांच्या बळजबरीने ताबा मिळविला होता. हुसेन यांच्या तक्रारीनंतर आबू व त्याचे भाऊ अमजद व शहदाजा खान यांच्याविरोधात मकोका लावण्यात आला होता. 


मकोका लागल्यापासून आबू फरारच होता. मार्च महिन्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून त्याच्या भावांना अटक केली होती. मात्र फरार झाल्यानंतर आबू सातत्याने त्याचे लोकेशन बदलत होता. 


अमरावती, अहमदाबाद, गडचिरोली इत्यादी ठिकाणीदेखील तो लपला होता. अखेर त्याच्या पाळतीवर असलेल्या नागपुर पोलिसांनी त्याला भंडारा येथून अटक करण्यात आली. यात भंडारा पोलिसांची भूमिका महत्वाची आहे हे विशेष.