अमर काणे झी 24 तास, नागपूर : जिल्ह्यातील चोर बावली परिसरात वाघाने दोन जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये पती-पत्नी दोघंही जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारा वाघ जखमी अवस्थेत होता. पती-पत्नी लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमी वाघाच्या हल्ल्यात महिलेच्या पायाला तर तिच्या पतीच्या हाताला दुखापत झाली. हल्ल्यात दोघे बचावले असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघंही मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत.



वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्वरित ॲक्शन घेत सर्व वाईल्ड लाईफच्या रेस्क्यू टीमला नागपूरवरून पाचारण केले. वाघ रस्त्याच्याकडेला वीस ते पंचवीस फूट जंगलात शिरला होता. वन अधिकाऱ्यांनी त्या वाघाला तिथेच बेशुद्ध करून रेस्क्यू केले.


मिळालेल्या माहितीनुसार मिस्ट्री उर्फ T1 नावाच्या वाघाचा अपघात झाला होता. या घटनेची माहिती मिळताच तातडीनं रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. या वाघाला बेशुद्ध करण्यात आलं त्यानंतर त्याला उपचारासाठी वन विभागाच्या ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारासाठी दाखल करण्यात आलं.


या वाघाच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे व्याकूळ असलेला जखमी वाघ झुडपात लपून बसला होता. सकाळी 9 च्या सुमारास पवनीकडून मनसरकडे जात जाताना रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्यासाठी दोन जण थांबले. एका विमला तिवारी या महिलेवर जखमी झालेल्या वाघाने हल्ला केला. महिसोबत असलेल्या पती मिथिलेश तिवारी यांच्यावर हल्ला केला.