मध्य प्रदेश : एखादा वाघ जर अचानक समोर आला, तर प्रत्येकाची तारांबळ उडणार हे सहाजिकच आहे. पण जर तुमच्या समोर वाघांचा कळपसमोर आला तर तुम्ही काय कराल? तुम्ही एक किंवा दोन किंवा फार तर तीन वाघांना एकत्र पाहिलं असेल. नागपूरजवळ मध्य प्रदेशच्या सीमेवर वाघांचा हा कळप डौलाने फिरताना पहायला मिळाला. वाघांचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियीवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा वाघांचा कळप मोठ्या डौलाने फिरत होता, तेव्हाच एक हरिण या कळपासमोर आलं. मोठ्या वाघांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसलं. मात्र यातल्या दोन बछड्यांनी त्या हरिणाच्या दिशेने चाल केली. दोन बछड्यांनी केलेल्या या शिकारीचा व्हीडिओ समोर आलाय. 



महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील तुरिया गेटजवळ वाघांनी केलेल्या शिकारीचा हा व्हीडिओ असल्याचं सांगण्यात येतंय. शिकार करणारे हे दोन वाघ हे लंगडी वाघिणीचे बछडे आहेत. 


रविवारी सकाळी लंगडी वाघिण आणि तिचे चार बछडे पेंच तुरिया गेटजवळू जाताना हरणांचा एक कळप तिथून जात होता...त्यापैकी एक सावज हेरत वाघिणीच्या दोन बछड्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याची शिकार केली. विशेष म्हणजे ही शिकारीची घटना तुरिया गेटवरून आलेल्या पर्यटकांच्या समोरच घडल्याने पर्यटकही अवाक झाले होते.