नागपूर मेट्रोची गुपचूप टेस्ट ड्राइव्ह

मेट्रोची एलिव्हेटेड मार्गावर पहिल्यांदा टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली.
नागपूर : नागपूर मेट्रोचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. अशातच नागपूर मेट्रोची एलिव्हेटेड मार्गावर पहिल्यांदा टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली. १५ ऑगस्टला ही टेस्ट ड्राइव्ह गुपचूप घेण्यात आली. एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्ट स्टेशन दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गावर मेट्रोची ही टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली.या टेस्ट ड्राइव्हमध्ये मेट्रोचे वरिष्ठ तंत्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नागपूर मेट्रोचा सुमारे ९० टक्के मार्ग हा एलिव्हेटेड आहे.