पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : गेल्या काही दिवसांपासून समलैंगिक विवाहाला (same sex marriage) कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) अनेक याचिकांवर सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे, या कायद्याला केंद्र सरकारने (Modi Government) विरोध करत समलैंगिक विवाहामुळे समाजाच्या नितीमुल्यांना मोठी हानी पोहोचले असं म्हणत सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. समलैंगिक विवाह म्हणजे केवळ शहरी विचारधारा असून ही विचारधारा सर्वांनाच मान्य नसेल, असेही केंद्र सरकारने म्हटलं आहे. समजात याबाबत संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. मात्र समलैंगिकता ही विकृती असून समलैंगिक विवाह हे समाजासाठी घातक ठरू शकतात अशा पद्धतीची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील राष्ट्रसेविका समिती प्रणित संवर्धिनी न्यास या दिल्लीच्या संस्थेतर्फे देश पातळीवर डॉक्टरांचं मत जाणून घेत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये वेगवेगळ्या पॅथीच्या 84 टक्के डॉक्टरांनी समलैंगिक विवाहास मान्यता देण्यास विरोध केल्याच मत सर्वेक्षणा दरम्यान नोंदवलं आहे.  सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या प्रलंबित याचिका पाहता समलैंगिक विवाहाना मान्यता देऊ नये किंवा कायदा करू नये असंच मत संवर्धिनी न्यास या संस्थेने व्यक्त केलं आहे.  समाजात ही विकृती फोफावत जाऊन समाजासाठी घातक ठरेल. तसेस समलैंगिक विवाहामुळे शाररिक आजाराची वाढ होईल, असेही या संस्थेने म्हटलं आहे. तर समलैंगिक मानसिक आजार असून हा बरा होऊ शकतो आणि  समलैंगिक दोघे एकत्र आले तरी मुलांचा सांभाळ करू शकत नाही, असं या संस्थेचे मत आहे.


"संवर्धिनी न्यास ही दिल्लीतील संस्था महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण, न्यायिक आणि वैद्यकीय दृष्टीकोण देण्याचे काम करते. संवर्धिनी न्यासने या संदर्भात देशभरातील डॉक्टरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जवळपास 350 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. यानुसार 61 टक्के डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही एक विकृती आणि आजार असून आपण बरा करु शकतो. 84 टक्के डॉक्टरांनी सुप्रीम कोर्टाने याला मान्यता देऊ नये असे म्हटलं आहे. यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होतील. मुळात ही विकृती असल्याने नैराश्याचे विविध प्रकार यातून जन्माला येतात. समजाने आणि संवर्धिनी न्यास याचा विरोध करावा असे वाटले. या अहवालात 30 वर्षांपेक्षा जास्त ज्या डॉक्टरांनी प्रॅक्टिस केली आहे अशा सर्वांनी सहभाग घेतला आहे. अनेक डॉक्टरांनी अशा अनेक केसेस ठीक केल्या आहेत. ही विकृती आपण ठीक करु शकतो. नेदरलॅंडच्या सर्वेनुसार यातून मानसिक विकार होतात हे समोर आले आहे. हे प्रकृती आणि समाजघातक आहे. यासाठी कायदा करण्याची गरज नाही," असे वैदकीय तज्ञ डॉ. अपर्णा सदाचार यांनी म्हटल आहे.