Nagpur News Today: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या आधी घराघरांत साफ-सफाई केली जाते. मात्र, एका कुटुंबावर दिवाळीपूर्वीच दुखःचा डोंगर कोसळला आहे. दिवाळीची साफ सफाई करताना असं काही घडलंय की चार वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपुरातील इसनानी भागात घडली आहे. (Nagpur 4 years Old Girl Died)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साफसफाई करत असताना चार वर्षीय चिमुकलीच्या अंगावर लाकडी कपाट पडले. यात ती गंभीर जखमी झाली होती. आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. ईकविरा राजेश गहलोत असं या चार वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून ऐन दिवाळीत कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


राजेश गहलोत हे मूळचे राजस्थान येथील असून कामानिमित्त ते नागपुरातील माधवनगरी इससानी भागात राहतात. दिवाळी निमित्त ते घराची साफसफाई करत होते. त्यामुळं घरातील काही सामान अंगणात काढून ठेवलं होतं. त्यात चपला ठेवण्याचे जुने कपाटही बाहेर काढले होते. घरातील सगळे साफसफाई करत असताना ईकवीरा मात्र अंगणात ठेवलेल्या सामानाजवळ खेळत होती. 


कपाटाजवळ खेळत असताना ते कपाट चिमुरडीच्या अंगावर पडले. भारी भक्कम असलेल्या या कपाटाखाली ती दबली गेली. तिचा रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातील सर्व अंगणात आले. तेव्हा ईकविरा गंभीर जखमी झाली होती. कपाटाचा जबर मार तिला बसला होता. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 


ईकवीराच्या मृत्यूचा कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. दिवाळीसाठी सगळे आनंदात असताना अचानक ईकवीराचे जाणे सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेले आहे. तर परिसरातही चिमुरडीच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.