Nagpur News : काँग्रेसमध्यल्या गटातटाचं राजकारण हे नेहमीच पाहायला मिळत असतं. अनेकदा काँग्रेसमधीलच काही गट एकमेकांचा विरोध करताना दिसत असतात. अशातच नागपुरातून (Nagpur) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपुरात काँग्रेसच्या (Congress) बैठकीत जोरदार राडा झाला आहे. बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी आपआपासत भिडले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासमोरच ही मारामारी झाली आहे. नाना पटोले यांच्यासमोरच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी सुरु होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंचावर उपस्थित होते. नाना पटोले यांच्यासोबत काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील बैठकीत उपस्थित होते. मात्र नेहमीप्रमाणे अंतर्गत वाद आणि कलह या बैठकीत दिसून आला. प्रदेशाध्यक्षांसमोरच एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.



नागपुरात काँग्रेसची बैठक सुरू असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जीचकार यांच्यात जोरदार राडा झाला. यामुळे प्रदेशाध्यक्ष समोर झालेल्या या राड्या नंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसे प्रमुख नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असतानी सुद्धा दोन्ही बाजूने कोणीही ऐकायला तयार नसताना एकमेकांचे समर्थक आपसात भिडले.त्यामुळे बैठक थांबून एकच राडा सध्या सुरू झाला. दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सध्या प्रमुख नेते समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे..महाकाळकर सभागृहाबाहेर सध्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एकच गर्दी आहे.


अमरावतीच्या शासकीय विश्राम गृहात काँग्रेस कार्यकर्त्यांची कर्मचाऱ्याला मारहाण


बुधवारी मध्यरात्री काँग्रेसचे काही कार्यकर्ते शासकीय विश्राम गृहात झाले होते. दाखल झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांरूम न दिल्याने विश्राम गृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण करतानाची दृश्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात मध्ये कैद झाली असून मारहाण करणारा कार्यकर्ता हा मंगरूळपीर येथील असून त्याच्या सोबत असलेले दोन कार्यकर्ते हे अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या संदर्भात कर्मचाऱ्याने फ्रेजरपुरा पोलिसात केली तक्रार दाखल केली असून पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहे.