ऐकावं ते नवलच! कँटिनमधला समोसा महागल्याने वकिलाने दिला राजीनामा
वैचारिक मतभेदांमुळे संघटना किंवा पक्षाचा राजीनामा दिला असं तुम्ही ऐकलं असेल पण या गोष्टीसाठी राजीनामा
नागपूर : राजकीय महत्वाकांक्षा, वैचारिक मतभेद या कारणांमुळे संघटना वा पक्षाच्या पदाचा किंवा सदस्यत्वाचा राजीनामा एखाद्याने दिल्याचं आपण ऐकत असतो. पण नागपुरात सध्या एका राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्हा न्यायालयातील कँटिनमधील समोसा महागल्यावरून डी बी ए वकील संघटनेच्या कार्यकरणीच्या सदस्याने राजीनामा दिला आहे.
अॅड. धर्मराज बोगाटी, असं राजीनामा देणाऱ्या वकिलाचं नाव आहे. न्यायालयातील दुसऱ्या माळ्यावर डीबीएद्वारे कँटिन चालवलं जातं. या कँटिनमध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचे दर गेल्या काही दिवसात वाढले आहेत. डीबीएच्या कँटिनने वकिलांना वाजवी किमतीत खाद्यपदार्थ पुरविणे अपेक्षित आहे.
पण असं असताना खाद्य पदार्थांच्या किमती वाढल्या, यामध्ये वकिलांचे हित नाही असा आरोप करत धर्मराज बोगाटी यांनी डीबीएच कार्यकारिणी सदस्यत्वचा राजीनामा यांनी दिला.
दरम्यान डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बोगाटी यांनी याप्रकरणी कधीच चर्चा केली नाही. भाववाढ कशी झाली याबाबत पदाधिकाऱ्यांशी काहीच चर्चा न करता राजीनामा दिल्याचं सांगितलं. सिलेंडर आणि पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेता सगळ्याच क्षेत्रात , खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात महागाई वाढल्यचही डी बी एच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.