अमर काणे, झी मीडिया, नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. कामाबरोबरच मनमिळावू स्वभावामुळे त्यांची विरोधकांकडूनही नेहमीच कौतुक करण्यात येतं. राज्यातही शिवसेना (Shivsena) भाजप (Bjp) युतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या नेत्यांमध्ये नितीन गडकरी हे सर्वात पुढे असल्याचे पाहायला मिळाले होते. याबद्दल त्यांनी वारंवार खुलेपणाने भाष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक प्रसंग सांगताना नितीन गडकरींनी पोलिसांचे कान टोचले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोलिसांच्या फुकट्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलयं.


नागपूर महानगरपालिकेद्वारे समाज विकास विभागाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनाच्या उद्देशाने शुक्रवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्वनिधी महोत्सवाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.


काय म्हणाले नितीन गडकरी?


"मी पावसाळ्यात अनेकदा व्हीएनआयटीजवळील  रस्त्यालगतच्या पथविक्रेत्याकडे भुट्टा खायला जातो. त्यावेळी रस्त्यालगतचे पथविक्री करणारे भुट्टेवाले मला सांगतात पोलिसवाले येतात ,भुट्टा खातात आणि पैसेही देत नाही आणि बसूही देत नाही ,फुकटात खातात," असे नितीन गडकरी म्हणाले.



अशा गरीबांना जगण्याचा अधिकार आहे की नाही याचा प्रत्येकाने विचार करायला हवा, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोलिसांना सुनावले आहे.