अमर काणे, नागपूर : क्राईम कॅपिटल ( Crime Capital) ही नको असलेली ओळख मिळालेले नागपूर (Nagpur ) सातत्याने हत्येच्या घटनांमुळे चर्चेत आहे. आता नागपूर शहर बिहारची राजधानी पाटण्याशी स्पर्धा करत असल्याचं चित्र आहे. २०१९ च्या NCRBच्या आकडेवारीनुसार एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या गुन्ह्याचे (Crime) नागपुरातील प्रमाण पाटण्यानंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याची उपराजधानी. संत्रानगरी. टायगर कॅपिटल अशा अनेक नावाने नागपुरला जगभरात ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात नागपूरच्या ओळखीत आणखी एकाची भर पडली आही, ती आहे गुन्हेगारीची. राज्याची क्राईम कॅपिटल. (Nagpur Crime Capital)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर शहरातील कायदा सुवस्थेवर चिंता निर्माण करणारी आकडेवारी नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरोच्या २०१९च्या अहवालातून समोर आली आहे. एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात नागपूर बिहारची राजधानी पाटण्यानंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरोने काही दिवसांपूर्वी क्रमांकावर आहे. एक लाख लोकसंख्येमागे पाटण्यात ४.७ हत्या झाल्या आहेत.


नागपूरात दर एक लाख लोकसंख्येमागे ३.६ हत्या झाल्या आहेत. मुंबईवा दिल्लीप्रमाणे नागपुरात मोठ्या टोळ्या नाहीत, मात्र हत्या सारख्या घटना जास्त घडत आहेत. नागपुरात गेल्या दोन दशकांहून अधिका काळापासून क्राईम रिपोर्टिंगचा अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकारांच्या मते इतर महानगरांच्या तुलनेत नागपुरात बाहेरून येणाऱ्यांची सख्या खूप वाढलेली आहेत. त्यात तरुणांकडे पैसे नसतात.  नको तेवढा इगो आणि त्यातून बदला घेण्याची भावना हे सर्व गुन्हेगारी जगतातील टोळ्या अचूक हेरतात. आणि त्यातून नवे गुन्हेगार तयार होतात. 



पोलिसांकडे गेल्यावरही आपल्याला न्याय मिळणार नाही, अशी निराशेची वृत्ती नागपुरात इतर शहरांच्या तुलनेत जास्त दिसून येते. त्यामुळे नागपुरात भांडण तंटे झाल्यावर स्वतः सूड घेण्याची वृत्ती फोफावली असण्याची शक्यता आहे. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ निखिल पांडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.