नागपूर :  जिल्ह्यामध्ये सतत वाढणारी बाधितांची संख्या लक्षात घेता 31 जानेवारीपर्यंत ग्रामीण भागातील शाळा बंद (Nagpur School) ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (Nagpur Ziila Parishad Ceo Yogesh Kumbhejkar) यांनी या संदर्भात रात्री उशिरा माहिती दिली. महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याबाबत (Maharashtra School Reopen) राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचे सुचविलं होतं. (nagpur rural school will closed till 31 january 2022 due to corona pandemic)


नागपूर जिल्ह्यात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या (Nagpur Corona Update) चार हजाराच्या घरात असून टक्केवारी 50 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे सध्याच मुलांना शाळांमध्ये एकत्रित आणणे उचित ठरणार नाही. यासंदर्भात जिल्ह्याच्या कोरोनाविषयक टास्कफोर्सने देखील बाधितांची संख्या बघून निर्णय घेणे योग्य ठरेल असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 31 जानेवारीला यासंदर्भातील आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.