नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी कंत्राटदार कंपन्यांची निवड
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी अंतिम १६ पैकी १३ कंत्राटदार कंपन्यांची निवड करण्यात आलीय. त्यामुळं महिन्याभरातच या प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी लागणारी ८१ टक्के जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिलीय. ४६ हजार कोटींचा हा प्रकल्प दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे.