Yuva Sanghasrsh Yatra: भाजपचे नेते वेळोवेळ संजय राऊतांना शरद पवारांचा चेला म्हणून डिवचत असतात. संजय राऊत हे शरद पवारांची स्किप्ट वाचतात यामुळे शिवसेनेला धोक्यात असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो. या पार्श्वभूमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. नागपूरमध्ये युवा संघर्ष यात्रेच्या सांगता कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या पवार साहेबांनना शुभेच्छा देण्यासाठी आणि छोट्या पवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण येथे उपस्थित आहोत. मधले पवार लटकत पडले आहेत कुठेतरी, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. त्यांना लटकतच राहुद्या. ही मर्दांची सभा आणि पळकुट्यांची सभा नाही. आम्ही लढू, संघर्ष करु आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असे राऊत म्हणाले. 


पंतप्रधान सगळीकडे गॅरंटी देत फिरत आहेत. 2024 ला मोदी, फडणवीस तुम्ही सत्तेत नसाल ही आमची गॅरंटी. त्यांच्यात एक फूल आणि 2 डाऊटफूल आहेत. 


अनिल देशमुख हे आमचे जेलमधील मित्र आहेत. ते आमचे जेलमधले मित्र आहेत. जेलमधली मैत्री पक्की असते. संघर्ष करणाऱ्यांची मैत्री पक्की असते. आम्ही वाकलो नाही, झुकलो नाही, असे ते म्हणाले. 


मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आणि मी पवार साहेबांचाही चेला आहे. याला म्हणतात डबल इंजिन असे विधान संजय राऊत यांनी केले.


रोहित पवार 800 किमी चाललात. 10 वर्षांपासून देश थांबलाय म्हणून आपल्याला चालाव लागलं, असे राऊत म्हणाले.