अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एका स्कूलबसच्या (School Bus) अपघाताची (Accident) धक्कादायक घटना समोर आली आहे.  स्कूलबसच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बसने आधी दोन ते तीन वाहनांना धडक दिली. त्यानंतर एका विजेच्या खांबाला बस धडकली. या अपघातात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कूलबस खाली येऊन आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षांच्या सम्यक कळंबे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. खसाळा इथल्या Marie Poussepin's acadmy -ICSE या शाळेची ही बस असल्याची माहिती आहे. दुपारी 3.45 मिनिटांनी ही घटना घडली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. स्कूल बसचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 



स्कूल बसचं चाक निखळलं
त्याआधी आज सकाळीच स्कूल व्हॅनचा (School Van) अपघात झाला होता. लहान विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचं चाक उड्डाणपुलावरून धावत असताना निखळलं. त्यानंतर व्हॅन बराच अंतर तशीच एका बाजूने रोडवर घासत गेली. सुदैवाने या घटनेत कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. आज सकाळी नागपूर वर्धा रोडवरील उड्डाण पुलावर ही घटना घडली.


टाटा मॅजिक व्हॅन मध्ये काही विद्यार्थी शाळेत जात असताना अचानक व्हॅनच्या डाव्या बाजूचा मागचं चाक निखळलं. त्यामुळे स्कूल व्हॅन काही अंतरापर्यंत तशीच रोडवर घासत गेली. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने ब्रेक लावले. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  सकाळची वेळ असल्यामुळे उड्डाण पुलावर जास्त गर्दी नसल्यामुळे इतर कुठलेही वाहन या व्हॅनला धडकले नाही आणि मोठी दुर्घटना टळली.


एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांनी शालेय स्कूल बसच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.