नागपूर :    उपराजधानीतील मध्यवर्ती मुख्य बाजारपेठ म्हणून सिताबर्डीची ओळख.शहरातील प्रत्येक जण खेरददारीसाठी सिताबर्डी मुख्य मार्गावर आवर्जुन जात असतोच.आता याच सिताबर्डी मार्गावर ‘स्ट्रीट फॉर पिपल’  या उपक्रमाचा शुभारंभ आज.  महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या हस्ते  व्हेरायटी चौकात करण्यात आला.या निमित्तानं या बाजारपेठेला नवं स्वरुप मिळणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नागपुरातीलच नव्हे तर विदर्भातून सिताबर्डी मार्गावर खऱेददारीकरता  नागरिक येत असतात.त्यामुळं नागपुरातील हा बाजारपेठ नेहमीच गर्दी असते.आता या बाजारपेठेला ‘स्ट्रीट फॉर पिपल’ या उपक्रमाच्या माध्यमातून नवे स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.खरेदीकरता येणारा नागरिकांना सुरक्षित आणि नियोबद्ध पद्धतीनं खरेदी करता यावी यादृष्टीनं  स्मार्ट सिटीच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. बर्डी बाजारपेठेत नेहमीच वर्दळ असते आणि वाहतुकीचाही गरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं ‘ स्मार्ट सिटी’तर्फे हॉकर्स, वाहने तसेच दुकानदारांसाठी नियोजन केले जात आहे.  पुढील 15 दिवस स्मार्ट सिटीच्या वतीने प्रायोगिक तत्वावर व्हेरायटी चौकापासून 300 मीटर पर्यंत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये हॉकर्सना सीताबर्डी मेन रोडच्यामध्ये बसून नियोजनबध्द पद्धतीनं जागा करुन देण्यात येईल. दोन्ही बाजूने नागरिकांसाठी येण्या-जाण्याची व्यवस्था राहील.


सीताबर्डी मार्ग 'व्हेईकल फ्री झोन’


मुख्य बाजारपेठ ‘व्हेईकल फ्री झोन’ असेल या रस्त्यावर सर्व प्रकाराच्या वाहनांवर बंदी घालण्यात येईल.  जेणेकरुन येथे येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वातावरण प्राप्त होईल.तसेच महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना ई-रिक्षाची व्यवस्था राहील. नागपूरसाठी हा नवा उपक्रम असला तरी याचा मोठ्या प्रमाणात दुकानदारांना व हॉकर्सला लाभ होणार आहे. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये दुकानदार, हॉकर्स व नागरिकांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येईल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना  ‘वॉकींग फ्रेंडली’ स्ट्रीट मार्केट उपलब्ध करून देणे आहे.