Sunil Kedar Out of Jail: माजी मंत्री सुनील केदार नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडले आहेत. त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय.  नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात ते दोषी आढळले होते. यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान नागपूर कारागृहाबाहेर केदार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. माजी मंत्री सुनील केदार यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने हजारो समर्थक मध्यवर्ती कारागृहाबाहेर जमा झाले होते. यावेळी पोलिसांचाही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. हजारोच्या संख्येने त्यांचे समर्थक कारागृहाबाहेर जमा झाले आहे. टायगर इज बॅक नावाचा होर्डिंग घेऊन समर्थक आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकालात राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले होते. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला होता. 2001-02 दरम्यान हा घोटाळा झाला होता. 


काय आहे प्रकरण?


मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद इथल्या काही कंपन्यांनी बँकेच्या रकमेतून 150 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही तसंच बँकेची रक्कमही परत केली नाही. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002ला न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं गेलं. तेव्हापासून हा खटला प्रलंबित होता. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला.