फुटबॉल वर्ल्डकपच्या नावाखाली व्यापाऱ्याची फसवणूक
फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये प्लॉयवुड आणि डेकोरेटीव्ह पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावावर नागपुरात एका व्यापाऱ्याची फसवणूक झाली आहे. प्रशांत राठी असे व्यापाऱ्याचे नाव आहे. राठी यांचा प्लायवूडचा मोठा व्यवसाय आहे.
नागपूर : फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये प्लॉयवुड आणि डेकोरेटीव्ह पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावावर नागपुरात एका व्यापाऱ्याची फसवणूक झाली आहे. प्रशांत राठी असे व्यापाऱ्याचे नाव आहे. राठी यांचा प्लायवूडचा मोठा व्यवसाय आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना राजू इंटरप्राईजेस नावाच्या कंपनीनं २०२२ कतार फिफा वर्ल्डकपसाठी स्टेडियमच्या सज्जतेसाठी मोठ्या प्रमाणात प्लायवूडची मागणी असल्याचे सांगितले. त्यासाठी साडेतीन हजार डॉलर्स म्हणजे सुमारे दोन लाख ६५ हजार रुपये बँक खात्यात भरण्यास आरोपींनी सांगितले.
राठी यांनी ते पैसे आरोपीच्या खात्यात जमा केले. मात्र, त्यांनंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राठी यांनी सीताबर्डी पोलिसांत तक्रार केली.