नागपूर : जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनींवर पोलिसाने पैसे उधळत गोंधळ घातला. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील नांद गावातील शाळेत घडलेला हा प्रकार उघडकीस आलाय. प्रमोद वाळके असे या पोलीस शिपायाचं नाव आहे. पोलिसाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नांद गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते... या दरम्यान पोलीस शिपाई प्रमोद वाळके शाळेत आला. सहावीच्या विद्यार्थिंनीचे नृत्य सादर होत असताना हा पोलीस स्टेजवर चढला आणि त्याने पैसे उधळले. 


यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आणि त्याला मंचावरून खाली उतरवले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आता या कृत्यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा