Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. (Maharashtra Political News) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. (Nagpur Winter Session) शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान, नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री,  ये दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर, नागपूरची संत्री, खातायेत मंत्री, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी देत परिसर दणाणून सोडला.


गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन रणकंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे. आज अब्दुल सत्तार त्यांच्यावरील आरोपाबद्दल  बोलणार आहेत. विधानसभा अधक्ष्यांनी त्यासाठी त्यांना परवानगी दिली आहे. अब्दुल सत्तार जमीन घोटाळाबाबत आज खुलासा करणार आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशन गायरान जमीन घोटाळा प्रकरणात काल  मंत्री अब्दुल सत्तार विधानसभेत आपली बाजू मांडणार होते. मात्र, काल अब्दुल सत्तार विधानसभेत काहीच बोलले नाहीत. 


घोषणाबाजीच्यावेळी आमदारांच्या हातात संत्री 



गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी जोरदार घोषणाबाजी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी केली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत 'नागपूरचे संत्री, भ्रष्टाचारी मंत्री', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. यावेळी आमदारांच्या हातात संत्रीही होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रोहीत पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले होते.


'विदर्भाच्या मुद्द्यांना अधिवेशनात न्याय मिळालेला नाही'


दरम्यान, कोरोनामुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. त्यामुळे विदर्भाच्या मुद्द्यांना अधिवेशनात न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. दोन आठवड्यांचे हे अधिवेशन तीन आठवड्यांचे करावे. जेणेकरुन विदर्भ, मराठवाडा, शेतकरी तसेच इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करता येईल, असे अजित पवार म्हणाले. त्यांनी 30 डिसेंबरपर्यंत अधिवेशन वाढविण्याची मागणी केली. दरम्यान, हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंतच चालणारंय..विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि अजित पवार होते.


तर दुसरीकडे नाथ जोगी समाजासाठी बच्चू कडूंनी आंदोलन पुकारलंय.. नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर 100हून अधिक नाथ जोगी बांधवांनी ठिय्या दिलाय.. बडनेरा भागात घरकुल द्यावं अशी मागणी या आंदोलकांनी केलीये.. त्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे..