सरकारला खडसेंनी टोल मुक्तीवरुन आणले अडचणीत, पवारांची साथ
हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे.
दीपक भातुसे / नागपूर : हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीच अडचणीत आणले आहे. खडसे यांना विरोधकांकडून बळ मिळत आहे. त्यामुळे आता भाजप सरकार काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
भाजपला घरचा आहेर
टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेवरून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून येत आहे. खडसेंना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे राज्य सरकारची टोल मुक्त घोषणा डोकेदुखी ठरलेय.
आज विधानसभेत ठाण्यातील मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरवस्थेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना खडसे यांनी टोलमुक्त महाराष्ट्र धोरणाबाबत शंका उपस्थित केली होती.
खडसे यांचे सरकारला प्रश्न
- टोल फ्री महाराष्ट्र हे धोरण सरकारने मागे घेतले आहे का?
- एकनाथ खडसेंचा विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सवाल
- ज्या रस्त्यांवर टोल बंद केले आहेत त्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचाही खडसेंचा आरोप
- माजी महसूल मंत्र्यांनी आजी महसूल मंत्र्यांना टोल फ्री महाराष्ट्र घोषणेबद्दल विचारले आहे
- ही टोल फ्री महाराष्ट्र घोषणा अंमलात येणार आहे का?
- अजित पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल,
- अजित पवार यांची एकनाथ खडसेंना साथ
या रस्त्यावर टोल नाही !
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले की, आम्ही राज्यात ३० हजार कोटीचे १० हजार किलोमीटरचे रस्ते हायब्रिड अॅन्युटीवर बांधणार आहोत. मात्र, या रस्त्यावर टोल लागणार नाही, असे ते म्हणालेत.