तरुणीने स्कूटर विकायला काढली, ग्राहक ट्रायल रनसाठी गेला अन्...
Nagpur News Today: ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नागपुरमध्ये एका तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली आहे
Nagpur News Today: ऑनलाइन वस्तू विकताना सावधानी बाळगणेदेखील महत्त्वाचे असते. (Online Shopping) अनेकदा आपण पाहतो की वस्तू मागवली एक आणि निघाली भलतीच त्यामुळं ग्राहकांचे नुकसान होते. ऑनलाइन वेबसाइटमध्ये ओएलक्स ही देखील लोकप्रिय ईकॉमर्स वेबसाइट आहे. मात्र, यावरुनही अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नागपूरमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. (Nagpur News In Marathi)
ओएलएक्सवर बाईक विक्रीची जाहिरात टाकणे एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. ऑनलाइन जाहिरात पाहून वाहन खरेदीसाठी आलेल्या तरुणाने ट्रायल घेतो म्हणून दुचाकी घेऊन गेला तो की परत आलाच नाही. खूप वेळा झाला तरी तरुण आला नाही हे पाहून तरुणीने त्याला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद येत होता. त्यानंतर यात काहीतरी गौडबंगाल आहे हे लक्षात आलं.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ट्रायलच्या नावावर वाहन चोरीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केलाय. पारुल सोनी असं तरुणीचे नाव आहे.
पारूलने तिच्या महागड्या गाडीच्या विक्रीची जाहिरात OLX वर पोस्ट केली. ती पाहण्यासाठी पारुलने केडीके कॉलेज रस्त्यावर पाहायला बोलावलं. तरुणाने ट्रायल घेतो सांगितलं मात्र दुचाकी घेऊन तो पसार झाल्यानं फसवणूक आणि चोरीची तक्रार देण्याची वेळ पारूल सोनीवर आली. पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, दिवाळी व फेस्टिव्ह सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग केली जाते. त्यामुळं बऱ्याचदा अशा घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने महागडा फोन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा फोनची ऑर्डर आली तेव्हा मात्र त्याला धक्काच बसला. बॉक्स उघडून बघताच त्याच्या आतमध्ये विम बार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याने तातडीने कॉल सेंटरवर संपर्क साधत तक्रार दिली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका उदाहरणात, एका व्यक्तीने 1 लाखांचा टिव्ही मागवला होता. मात्र, प्रत्यक्षात घरी दुसऱ्याच कंपनीचा टिव्ही आला होता. फेस्टिव्ह सिझनमध्ये ऑनलाइन शॉपिंग करत असताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे.