नागपूर : नागपूरच्या मौदा तालुक्यातील महालगाव शिवारात एसटी बस आणि टिप्परमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर सुमारे वीस प्रवासी जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरहून तुमसरला जाणा-या एसटीने रस्त्याच्या कामासाठी उभ्या असलेल्या टिप्परला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की एसटी बसचा पुढील भाग चक्काचूर होऊन उजवा भाग चिरला गेला.


या अपघातात एका वृद्ध प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचाराकरिता नागपूरच्या मेयो आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मेयो रुग्णालयात उपचारा दरम्यान आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. चार ते पाच जखमींची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आलंय.