Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan: वर्ध्यामध्ये (Wardha) 96 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचबरोबर 17 वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan) देखील आयोजित करण्यात आलंय. त्यानिमित्त अभिनेता आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे वर्ध्यात आले आहेत. त्यांनी साहित्य संमेलन येथे ग्रंथ दालनाला भेट दिली. त्यानंतर बोलताना नागराज मंजुळे यांनी लंडनमधील किस्सा सांगितला. (Nagraj Manjule told the story from London in Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan Wardha News)


काय म्हणाले Nagraj Manjule?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी पहिल्यांदाच लंडनला (London) गेलो होतो. माझ्यासोबत माझे दोन मित्र होते. भारतात कधी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (Five star hotel) जायला मिळालं नाही, पण लंडनला आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलो. स्टुडिओ अपार्टमेंटसारखी रूम आम्हाला मिळाली होती. रोज सकाळी उठल्यानंतर माझे मित्र चहा बनवायचे. एकदा सकाळी माझे मित्र रुमवर आले नाहीत. तेव्हा मी एकटाच होतो. सकाळी उठल्यानंतर प्रथम व्यायाम केला. त्यानंतर चहा करण्याचा विचार मी करत होतो. 


हॉटेलमध्ये इलेक्ट्रीक टी-मेकर (Electric Tea Maker) होता. मात्र, मी कधी त्याचा आधी वापर केला नव्हता. मी त्या टी-मेकरचा प्लग लावला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि तो टी-मेकर मी शेगडीवर ठेवला. व्यायाम करत असताना अचानक धूर निघू लागला. धूर निर्माण झाल्याने रुममधील सायरन (Alarm) वाजू लागला. सायरन वाजताच माझ्या मनात धडकी भरली. स्टाफ मेंबर धावत आले. त्यावेळी मला त्यांच्या तोडीचं इंग्रजी येत नव्हतं. त्यांनीच मला टी-मेकर आणून दिला आणि मला चहा बनवण्याची प्रोसेस देखील सांगितली, असा किस्सा नागराज मंजुळे (Nagraj Manjule told the story from London) यांनी यावेळी सांगितला आहे.


आणखी वाचा - नागराजचा पहिला दिवस...वाटलं हा फक्त कवी...पण म्हणतात ना तो तर लई बारा गावचं...


नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे या दोन्ही अभिनेत्यांनी बुक स्टॉल (book Stall) यांना भेट दिली तर काही पुस्तके देखील विकत घेतलीय. पुस्तक घेण्याची ही संधी आहे म्हणून याठिकाणी येथे आलो आहेय.  तर याठिकाणी अनेक प्रकाशनाची दुकाने आहेत. चांगली पुस्तके या ठिकाणी आहेय. या ठिकाणी छान वाटतं. साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan) होतात तशी वृक्ष संमेलन जास्त व्हायला पाहिजे वृक्षापासून कागद बनतो आणि त्या कागदावर लिहून विचार देतात. चांगली कलाकृती आहे .पहिले त्याला प्राधान्य दिले पाहिजे नंतर साहित्याला दिले पाहिजं, असं मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी झी 24 तास शी बोलतांना मांडलं.