Indurikar Maharaj On Gautami Patil : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) यांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil)वर निशाणा साधला आहे. आपल्या किर्तनातच इंदुरीकर महाराज यांनी गौतमीचे नाव घेतले आहे.  इंदुरीकर महाराज यांनी आपल्या खास शैलीत गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे. संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचे म्हणत इंदुरीकर महाराज यांनी गौतमीच्या डान्स स्टेपवर देखील टीका केली आहे.   


तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडनंतर आता शिर्डीमध्ये देखील कीर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजांनी नाव न घेता पुन्हा एकदा गौतमी पाटीलवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र, तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात...तीनच गाणी पण शिट्ट्या किती? असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी थेट गौतमी पाटील किती मानधन घेते हेच सांगितले आहे. 


पाटलाचा गाडा या गाण्यावर गौतमीचा डान्स सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. यावरुन देखील इंदुरीकर महाराजांनी गौतमीवर टीकास्त्र सोडले. गाडा आला आणि घाटात राडा झाला...असे म्हणत, थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकरांनी उपस्थितांना दिला. शिर्डीत महापशुधन एक्स्पोच्या समारोपानिमित्ताने इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी गौतमीवर त्यांनी निशाणा साधला.


गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत इंदुरीकर महाराजांचे नाव


आक्षेपार्ह डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होते. ही गर्दी नियंत्रणात आणता आणता पोलिसांच्या नाकी नऊ येते. गौतमीचे अनेक चाहते असले तरी तिचे तितकेच विरोधक देखील आहेत. गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) नाव देखील सामील झाले आहे. 


गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी


गावागावात लावणीच्या नावानं अक्षरशः धांगडधिंगा सुरू आहे. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. पदाधिका-यांनी असे कार्यक्रम आयोजित करू नयेत असे फर्मानच अजित पवारांनी काढले होते. त्यानंतर गौतमी पाटीलने सपशेल शरणागती पत्करली होती. गौतमी पाटीलनं अजित पवारांची माफी मागितली. अजितदादा मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. झालेल्या चुकांची माफी मागितली तरीही लोक जुने व्हिडिओ काढून ट्रोल करतात असं गौतमीने म्हंटल होते.