COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर : अभिनेता नाना पाटेकर, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यात कोल्हापुरातील एका कार्यक्रमात चांगलाच संवाद रंगला. पाहा यात नाना पाटेकर काय म्हणाले...


जेव्हा जेव्हा शेतकरी संघटीत होण्याचा प्रयत्न करतो..पण...- नाना पाटेकर


जेव्हा जेव्हा शेतकरी संघटीत होण्याचा प्रयत्न करतो, त्या त्या वेळी संघटीत शक्ती तोडण्याचा प्रयत्न केला जातो,  हे दुर्दैवी आहे, अशी खंत नाना पाटेकर यांनी, चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित खंत व्यक्त केली आहे.


तुम्ही एकटे सच्चे असून उपयोग नाही...चंद्रकांतदादा


चंद्रकांतदादा तुम्ही एकटे सच्चे असून उपयोग नाही, बाकीचे सच्चे पाहिजे, असाही चिमटा नाना पाटेकर यांनी काढला. काशीबाई नाचली हे मला नाही आवडल, म्हणून बाजीराव मस्तानी सिनेमाबद्दल मला किळस वाटला, म्हणून मी पाहिला नाही, असं नाना पाटेकर यांनी या कार्यक्रमात म्हटलं आहे.