Devendra Fadanvis : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ पहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena) फुटल्यानंतर राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण पहायला मिळतंय. अशातच अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) रोखठोक उत्तरं दिली. त्यावेळी फडणवीसांनी मजेदार किस्से देखील सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीसांची भाषणशैली नेमकी वेगळ्या दर्जाची राहिली आहे. त्यावर अनेकदा मीम्स देखील पहायला मिळतात. यावरून नाना पाटेकर यांनी फडणवीसांना सल्ला दिला होता. विधानसभा निवडणूक भाषण करताना फडणवीस वरचा स्वर लावायचे, असं नाना म्हणाले. तो वरचा स्वर लावू नका, असा सल्ला नानांनी फडणवीसांना सांगितला होता. त्यावर बोलताना फडणवीसांनी किस्सा सांगितला.


काय म्हणाले फडणवीस-


माझ्या भाषणाची तीव्रता कमी होण्याचं श्रेय नानांना जातं. विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा आणि म्हणायचे अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल आणि शांतपणे बोल, असं फडणवीस म्हणाले.


नाना पाटेकर यांचा सल्ला मी कबूल करायचो आणि त्यांना म्हणायचो माझं पुढचं भाषण ऐका. त्यानंतर पुढच्या भाषणात पुन्हा तसंच बोलायचो, असं फडणवीस म्हणाले. पुन्हा माझं भाषण (Devendra Fadanvis Speech) झाल्यानंतर नाना पाटेकर यांचा पुन्हा फोन येयचा, असं फडणवीस म्हणतात कार्यक्रमात एकच हशा पिकला.


मात्र, हळूहळू मी प्रयत्न करून ते बदललं आणि आता मी ते पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे याचं 100 टक्के श्रेय नाना पाटेकरांचं आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यावेळी फडणवीसांनी समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) देखील मोठं वक्तव्य केलं. तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी तयारी करावी लागेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.