नागपूर : मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त विधानानंतर पंतप्रधान मोदी स्वतःच्या जातीचा उल्लेख करत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत... मात्र तेच पंतप्रधान मला माझ्या जातीसाठी न्याय मागू देत नसल्याचा आरोप माजी खासदार आणि माजी भाजप नेते नाना पटोले यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपण येत्या ११ डिसेंबर रोजी राहुल गांधींसह गुजरातमध्ये जाऊन प्रचार करणार आहोत... त्यावेळी मोदींच्या जातीची चौकशीची मागणी करणार असून त्याची वैधताही तपासणार असल्याची घोषणा यावेळी नाना पटोले यांनी केलीय.


तुर्तास भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आपण गुजरातमध्ये जाऊन काँग्रेसचे हात बळकट करणार आहोत. परंतु, नेमके कुठल्या पक्षात जायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.


आपल्या मतदार संघातील जनतेशी चर्चा करून कुठला पक्ष निवडायचा? याचा निर्णय करु किंवा स्वत:चा पक्ष काढून असं त्यांनी स्पष्ट केलं.