रत्नागिरी : राज्य आणि केंद्र सरकार नाणार प्रकल्पग्रस्तांवर जबरदस्ती करणार असेल तर काँग्रेस पक्षाचा प्रकल्पाला ठाम विरोध असेल, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.  काँगेसचं शिष्ठमंडळ दोन दिवसांपासून नाणारच्या दौऱ्यावर आले आहे. काँग्रेसचे खासदार हुसैन दरवाई, माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांसह २० जणांचा या शिष्ठमंडळात समावेश आहे. दरम्यान, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून हा विनाशकारी प्रकल्प बागायती क्षेत्रामध्ये कशासाठी असा सवाल देखील कॉंग्रेसने उपस्थित केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, केंद्र सरकारने रिफायनीसंदर्भात एक करार केलाय. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस नाणार प्रकल्पासाठी आग्रही आहेत. आपण विरोधकांची समजूत काढू,अशी जाहीर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यामुळ हा प्रकल्प होणार याचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या भावना काँग्रेसपक्ष श्रेष्ठींपर्यंत एका अहवालाच्या माध्यमातून सादर केल्या जाणार आहेत. काल राजापूरपासून काँग्रेसच्या दौऱ्याला सुरुवात झाली त्यानंतर नाणार, इंगळवाडी, तारळ, चौके गावातल्या  प्रकल्पग्रस्तांच्या शिष्ठमंडळानं भेटी घेतल्या. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही नाणारचा दौरा करणार आहेत. त्यापूर्वीच काँग्रेसने दौरा करुन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


काँग्रेसने नाणार प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचा भावना जाणून घेतल्या. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून हा विनाशकारी प्रकल्प बागायती क्षेत्रामध्ये कशासाठी असा सवाल देखील कॉंग्रेसने उपस्थित केलाय. स्थानिकांचा याला विरोध असताना हा प्रकल्प लादला जात आहे. यामुळे कोकणचे अस्तित्व संकटात येऊ शकते. याबाबत प्रकल्पग्रस्तांचे नेमके काय म्हणणे आहे हे जाणून घेतल्याची माहिती खासदार हुसेन दलवाई यांनी दिली.